पोस्ट्स

ते दिवस लेबलसह पोस्ट दाखवत आहे

हुशार असताना दहावीत कमी गुण कसे काय मिळाले ? खरं कारण...

लोक आजही विचारतात - हुशार असताना दहावीत कमी गुण कसे काय मिळाले? याचं उत्तर मी आजवर कोणाला मनमोकळं दिलं नव्हतं. आज देतोय... ही गोष्ट आहे सन २००० मधली. दहावीच्या परीक्षेसाठीचे केंद्र आमच्या गावात (कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) नव्हते. त्यामुळे जवळच्याच निमगाव या गावात परीक्षा केंद्र असल्याने दररोज जीपने आम्ही सर्व मुलं, मुली परीक्षेसाठी निमगाव (ता. माढा) ला जायचो. पहिलाच पेपर द्यायला परीक्षा हॉलमध्ये शिरलो आणि कळलं, हे परीक्षा सेंटर कमी आणि गोंधळच जास्त आहे. सगळीकडे कॉपीचा गोंधळ चालू होता. खिडकीतून आत पुस्तके, चिठ्ठ्या फेकल्या जात होत्या. काही शिक्षकच उभे राहून सांगत होते. मी आयुष्यात कधी कॉपी केली नव्हती, करायचीही नव्हती. आई वडील व गुरुजणांचे संस्कारच तसे होते.   त्या वातावरणात माझी भीती वाढली.  त्याच हॉलमध्ये एका मोठ्या राजकीय नेत्याचा मुलगाही परीक्षा देत होता. त्याला कॉपी पुरवण्यासाठी बाहेर अख्खी यंत्रणा काम करत होती. आम्ही बाकीचे विद्यार्थी फक्त बघत होतो. आम्हाला ओरडून सांगितलं जायचं - "गप्प बसा, पेपर लिहा." एका बाजूला कॉपी करणाऱ्यांचा गोंधळ, दुसऱ्या बाजूला आमच्यासारख्...