कामात बदल हवाच

       


               आज वृत्तपत्रातून काम सोडून दोन वर्षे होऊन गेली. आणि जनसंपर्क या क्षेत्रात पदार्पण केले. स्वतःची पीआर फर्म सुरू केली. यामुळे पीआरओ'ची कामे मिळविण्यासाठी व्यस्त होतो. आजही व्यस्त असतो, नाही असे नाही. पण कामात जम बसला आहे. त्यामुळे पीआर सुरू करतेवेळी उडत होती, तशी धांदल आता उडत नाही. विविध वृत्तपत्रांचे संपादक, उपसंपादक, पत्रकार यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. 

          चॅलेंजिंग क्षेत्र निवडल्याने कामाचे समाधान मिळतंय. थोडा जरी कंटाळा केला, तरी हातचे काम गेलेच म्हणून समजायचं. आपण थांबलो तरी लोकांना थांबायला वेळ नाही, असा हा काळ आहे. त्यामुळे सर्वोत्तम सेवा देणे, हे क्रमप्राप्त आलेच. त्यामुळे कामात कंटाळा करून अजिबात जमत नाही. पत्रकारिता आणि जनसंपर्क हातात हात घालून सोबत चालत आहेत. मात्र, आज माध्यमांची रूपे बदलत असून, सोशल मीडियाशिवाय पण हलत नाही. तसेच वेब जर्नालिझम वाढत आहे. तरीपण प्रिंट जर्नालिझमकडेच वाचकांचा, व्यावसायिकांचा आजही कल कायम आहे. त्यामुळे एक पीआर म्हणून काम करताना दररोज स्वतःला अपडेट ठेवावे लागते. वृत्तपत्रे, वेब पोर्टल्स, वृत्तवाहिन्या, मॅगझीन्स, ब्लॉग्स यांचा अभ्यास ठेवावा लागतो आहे. या सर्व प्रसारमाध्यमात दररोज बदल होत आहेत. त्यानुसार स्वतःलाही बदलावे लागते, अगदी रोजच्या रोज. 

            असं म्हटलं जातं, की माणूस जेवढा व्यस्त तेवढा त्याचा सर्वांगाने विकास होत जातो. पीआर म्हणून काम करताना हे मनोमन पटतं. आणि वेगळं आणि चॅलेंजिंग क्षेत्र निवडल्याचं समाधान मिळत आहे. विशेष म्हणजे कामाची विशिष्ट वेळ नाही. बऱ्याचदा इतरांच्या वेळेनुसार आपली वेळ ठरवावी लागते. पण जमतं ऍडजस्ट करणं, नव्हे ऍडजस्ट करावंच लागतं. असो. आता यासोबतच ब्लॉग लेखन करून स्वतःला मानसिकदृष्ट्या ठणठणीत ठेवून इतरांनाही वैचारिक खुराक देण्याचा प्रयत्न असणार आहे...
                                              ....आपलाच ज्ञानदा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट