पोस्ट्स

प्रवासात रुतले काटे, पण...

इमेज
- हुशार असताना दहावीत कमी गुण कसे काय मिळाले ?  -बारावी कला शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर पुढं काय ? -बी.ए. प्रथम वर्ष अर्ध्यावर सोडून कंपनीत काम का शोधलं ?  -ते काम का सोडलं ?   -सेंटरिंगच्या अति कष्टाच्या कामामुळे पश्चाताप ?  -परफेक्ट प्लम्बर कसा झालो ?  -बी.ए. द्वितीय वर्षाची परीक्षा कशी दिली ?  -बी.ए. पदवी कशी मिळविली ?  -पदवीनंतर फॅशन डिझायनिंग शॉर्ट टर्म कोर्सचं पुढं काय झालं ?  -पुणे विद्यापीठात कसा प्रवेश मिळाला ?  -विद्यापीठातले दिवस ?  -मराठी विषयात एम.ए. झाल्यानंतर सेट नेट किंवा बी.एड. का नाही केलं ?  -एका विषयात एम.ए. केल्यानंतर पत्रकारितेतही पदव्युत्तर पदवी का घ्यावी वाटली ?          या आणि अशा अनेक प्रश्नांवर गेल्या अनेक वर्षांपासून लिहावंसं वाटतंय, पण कामाच्या व्यस्त शेड्युलमुळं लिहिणं झालं नाही. आता लिहिलंच पाहिजे, असं वाटायला लागल्याने लिहायला घेत आहे. जसं जसं लेखन होत जाईल, तसं ब्लॉगवर टाकत जाण्याचा विचार आहे. या लेखनात घटनांचा क्रम चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही विस्मरणात गेलेल्या आठवणी या लिखाणाच्या दरम्यान आठवू शकतात. त्यामुळं

कामात बदल हवाच

इमेज
                       आज वृत्तपत्रातून काम सोडून दोन वर्षे होऊन गेली. आणि जनसंपर्क या क्षेत्रात पदार्पण केले. स्वतःची पीआर फर्म सुरू केली. यामुळे पीआरओ'ची कामे मिळविण्यासाठी व्यस्त होतो. आजही व्यस्त असतो, नाही असे नाही. पण कामात जम बसला आहे. त्यामुळे पीआर सुरू करतेवेळी उडत होती, तशी धांदल आता उडत नाही. विविध वृत्तपत्रांचे संपादक, उपसंपादक, पत्रकार यांचे चांगले सहकार्य मिळत आहे.            चॅलेंजिंग क्षेत्र निवडल्याने कामाचे समाधान मिळतंय. थोडा जरी कंटाळा केला, तरी हातचे काम गेलेच म्हणून समजायचं. आपण थांबलो तरी लोकांना थांबायला वेळ नाही, असा हा काळ आहे. त्यामुळे सर्वोत्तम सेवा देणे, हे क्रमप्राप्त आलेच. त्यामुळे कामात कंटाळा करून अजिबात जमत नाही. पत्रकारिता आणि जनसंपर्क हातात हात घालून सोबत चालत आहेत. मात्र, आज माध्यमांची रूपे बदलत असून, सोशल मीडियाशिवाय पण हलत नाही. तसेच वेब जर्नालिझम वाढत आहे. तरीपण प्रिंट जर्नालिझमकडेच वाचकांचा, व्यावसायिकांचा आजही कल कायम आहे. त्यामुळे एक पीआर म्हणून काम करताना दररोज स्वतःला अपडेट ठेवावे लागते. वृत्तपत्रे, वेब पोर्टल्स, वृत्तवाहिन्या, म
इमेज
                           अखेर लिहितोय...                         ब्लॉग लिहायचा असं ठरवून जवळपास दहा वर्षे झाली. ब्लॉग सुरूही केला. मात्र, त्यावर काही लिहिणं झालंच नाही. वृत्तपत्रात काम करीत असताना दररोजचे रिपोर्टिंग, नवीन विषय शोधून त्यावर लिहिणे, शिवाय रविवार पुरवणीसाठी लेख लिहिणे हा नित्यक्रम असायचा. वृत्तपत्रात कामाला सुरुवात करण्याआधी म्हणजे पत्रकारितेची शेवटची परीक्षा संपल्याबरोबर ब्लॉग सुरू केला होता. शाळेतील दिवस, कॉलेज जीवन, विद्यापीठातील दिवस, तसेच इतर अनेक आठवणी लिहिण्यासाठी ब्लॉगची निर्मिती केली होती. त्यामुळेच ब्लॉगला 'ते दिवस' हे नाव दिले. कामाच्या व्यापामुळे आजपर्यंत ब्लॉगवर लिहू शकलो नव्हतो. आज मात्र वृत्तपत्रातील कामाला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे 'त्या' दिवसांवर लिहायला सुरुवात करीत आहे.                                   ....आपलाच ज्ञानदा