प्रवासात रुतले काटे, पण...




- हुशार असताना दहावीत कमी गुण कसे काय मिळाले ? 
-बारावी कला शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर पुढं काय ? -बी.ए. प्रथम वर्ष अर्ध्यावर सोडून कंपनीत काम का शोधलं ? 
-ते काम का सोडलं ?  
-सेंटरिंगच्या अति कष्टाच्या कामामुळे पश्चाताप ? 
-परफेक्ट प्लम्बर कसा झालो ? 
-बी.ए. द्वितीय वर्षाची परीक्षा कशी दिली ? 
-बी.ए. पदवी कशी मिळविली ? 
-पदवीनंतर फॅशन डिझायनिंग शॉर्ट टर्म कोर्सचं पुढं काय झालं ? 
-पुणे विद्यापीठात कसा प्रवेश मिळाला ? 
-विद्यापीठातले दिवस ? 
-मराठी विषयात एम.ए. झाल्यानंतर सेट नेट किंवा बी.एड. का नाही केलं ? 
-एका विषयात एम.ए. केल्यानंतर पत्रकारितेतही पदव्युत्तर पदवी का घ्यावी वाटली ? 
        या आणि अशा अनेक प्रश्नांवर गेल्या अनेक वर्षांपासून लिहावंसं वाटतंय, पण कामाच्या व्यस्त शेड्युलमुळं लिहिणं झालं नाही. आता लिहिलंच पाहिजे, असं वाटायला लागल्याने लिहायला घेत आहे. जसं जसं लेखन होत जाईल, तसं ब्लॉगवर टाकत जाण्याचा विचार आहे. या लेखनात घटनांचा क्रम चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही विस्मरणात गेलेल्या आठवणी या लिखाणाच्या दरम्यान आठवू शकतात. त्यामुळं त्याही येतीलच. लिहिताना वर दिलेला क्रम पाळण्याचा कटाक्ष असणार आहे. या दरम्यान एखादा मुद्दा सविस्तर मांडला जाऊ शकतो. आणि एखादा मुद्दा अगदी काही शब्दात मांडून होईल. पण सर्व मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न असणार आहे... 
                                                क्रमशः ......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट